Today havaman ; पुढील 5 ते 6 दिवस राज्यात गडगडाटासह आवकाळी पाऊस
राज्यात आवकाळीचे वातावरण तयार झाले आसून वादळी वाऱ्यासह पाऊसही होत आहे. आजही राज्यातील अनेक भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने दिलेला आजपासून पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज आपण सविस्तर पाहुयात…
आजपासून पुढील 5 ते 6 दिवस संपूर्ण राज्यभरात गडगडाटासह आवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात 10 ते 16 मे दरम्यान पावसाची शक्यता आहे.
आज (10 मे) मराठवाड्यातील बिड, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली, छ.संभाजीनगर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा सोलापूर या जिल्ह्यात आवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे..
विदर्भातील वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यातही आवकाळीचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलाय, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.
पुर्वमोसमी पाऊस राज्यात पुढील 5-6 दिवस सक्रिय राहनार आहे.या पावसात विजांसह पाऊस पडन्याची शक्यता वर्तवन्यात आली आहे..
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/S5G2KHFEzX— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 10, 2024