मान्सूनचा पाऊस लांबणीवर शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा...
मान्सूनचा पाऊस ; मान्सून 01/जुन पासुन सक्रिय झाला असून 15 जुन पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असे पूर्वानुमान हवामान खात्याने दिले होते. परंतु मागिल पाच वर्षाचे रेकॉर्ड पाहिले तर विदर्भात मान्सून जुन च्या शेवटच्या आठवड्यात सक्रिय झाला. म्हणजे मान्सून 15 दिवस पुढे शिफ्ट झाला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपेक्षा बंगालच्या खाडीतून येणाऱ्या वाऱ्यावर विदर्भात पाऊस सक्रिय होतो. बंगालची शाखा हि उशिराने सक्रिय होत असल्याने विदर्भात मान्सून सक्रिय होण्यासाठी 24/जुनपर्यत वाट पहावी लागणार आहे.
विदर्भात कापुस उत्पादक शेतकरी अधिक असुन मृग नक्षत्रात पेरण्या झाल्या तर उत्पादन चांगले होते आणि लेट लागवड झाली तर उत्पन्नावर परिणाम होतो. परंतु यंदा 20/ जुन उलटला असुन मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी घाई करताना दिसतात.
24/जुन पर्यंत पावसाची प्रतीक्षा (हवामान विभाग)
विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी शनिवार पासून सुरूवात होईल व सोमवारपासून विदर्भात मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांनी लगेचच पेरणीसाठी घाई करू नये.
मान्सून आला की लगेच पेरणी करावी असे नाही पेरणीसाठी जमिनीत योग्य ओल असावी तसेच मान्सून स्थिरावला पाहिजे आणि कृषी विभाग जेव्हा सांगेल पेरणी करा तेव्हा शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होते असे पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सांगितले आहे..