हवामान अंदाज 21 जून ; आज या जिल्ह्यात मुसळधार, पाऊस आनखी वाढन्याची शक्यता
हवामान अंदाज 21 जून ; मान्सूनन आज महाराष्ट्राच्या आनखी काही भागात पुढे सरकला आसुन उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडन्याची शक्यता आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय….
आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे तर छ.संभाजीनगर, बिड, लातूर, जळगाव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. (हवामान अंदाज 21 जून)
के.एस होसाळीकर यांनी पुढील 4 आठवडे पाऊस कसा राहील याबाबत माहिती ट्विटरवर दिली आहे. पावसात हळूहळू वाढ होत जाऊन जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसात चांगली सुधारणा होईल. 27 जून ते 4 जूलै या आठवड्यात राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. – के.एस होसाळीकर