कापूस खत व्यवस्थापन ; कापसासाठी पहिला डोस कोणता द्यावा….
कापूस खत व्यवस्थापन ; आपल्या महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात तसेच खानदेशात कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. कापसाच्या चांगल्या उत्पादनासाठी वेळेवर लागवड, चांगल्या दर्जाचे बियाणे, सिंचनाची सुविधा, किटकनाशकांची फवारणी तसेच अगदी वेळेवर तणनियंत्रण होणे या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. या लेखात आपण कापसाला खताचा पहिला डोस कोणता द्यावा तसेच पहिला डोस किती दिवसांनी व किती प्रमाणात द्यावा याबाबत माहिती पाहुया.
कापूस पिकांला सुरुवातीला लागवडीसोबत खत द्यावे जर लागवडीसोबत खत दिले नाही तर पहिला डोस साधारण 15 दिवसानंतर द्यावा. पहिल्या डोस मध्ये पिकांची वाढ होण्यासाठी 20-20-00-13 या खताची निवड करावी. 20-20-00 -13 हे खत उपलब्ध होत नसेल तर 10-26-26 , DAP, 15,15,15 यासारख्या कोणत्याही खताचा वापर करू शकता याचे प्रमाण एकरी एक 50 किलो याप्रमाणे घ्यावे. यासोबत युरिया एकरी 15 ते 20 किलो पर्यंत वरिल मिश्र खतासोबत मिसळून द्यावे.
यासोबत कापूस पिकाला 10 ते 15 दिवस झाल्यावर फवारणी पंपा द्वारे झाडाच्या बुंध्याजवळ 19-19-19 एकरी 01 किलो त्यासोबत हुमिक जेल याची आळवणी करावी. या आळवनीमुळे पिकाच्या पांढऱ्या मुळाची जोमाने वाढ होते व आपण दिलेले अन्नद्रव्ये म्हणजे खते घेण्यास सक्षम होते. हि आळवणी करताना जमिनीत ओलावा असने आवश्यक आहे. कापूस उत्पादनात वाढ होण्यासाठी एकदा आळवणी अवश्य करावी.