भेंडवळची भविष्यवाणी वादात, कोनताही वैज्ञानिक आधार नसल्याचे अंनिसचे म्हनने
यंदा पाऊस कसा पडेल…कोनत्या महिन्यात कसा राहील पाऊस…यंदा कोनती पिकं चांगली येतील..नैसर्गिक आपत्ती येतील का याबाबत भविष्यवाणी भेडवळ गावी अक्षयत्रुतीयेच्या मुहुर्तावर करण्यात येते, मात्र हि भेडवळची भविष्यवानी यंदा वादात सापडली असुन हि प्रथा बंद करन्यात यावी अशी मागणी अंनिस कडून करन्यात आली आहे.
भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये यंदा कोनती भाकीतं करन्यात आली आहेत आणि हि प्रथा वादात का सापडली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या पोष्टमध्ये पाहूयात…
भेडवळचा अंदाज 2024
यंदा पाऊस चांगला राहील आणि पिकांचे उत्पादन उत्तम आसेल,..पावसासोबतंच यंदाही आवकाळी आणि पुराचा धोका कायम राहनार आहे असं भाकीत भेंडवळच्या भविष्यवाणी मध्ये करन्यात आलंय.।
यंदा जुनमध्ये कमी पाऊस होईल,जुलैमध्येही कमीचं पण जुनपेक्षा बरा पाऊस राहील आणि आँगष्ट सप्टेंबर मध्ये भरपूर पाऊस राहील…सोबतंच देशाचा राजा कायम राहील असंही भाकीत या भविष्यवाणीत करण्यात आलंय…
भेंडवळची भविष्यवाणी वादात कशामुळे ?
भेंडवळच्या भविष्यवाणीला कोनताही वैज्ञानिक आधार नाही, मागच्या वर्षीचे अंदाज पाहता हे अंदाज खरे ठरत नसल्याचे अंनिसने (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) म्हटले आहे. कोनतीही भाकितं आणि अंदाज 50% पर्यंत खरे ठरु शकतात त्यामुळे हि एक अंधश्रद्धा आसल्याचं अंनिसने म्हटले आहे.
मागील वर्षी तुर आणि गहु उत्तम पिकं सांगितली गेली पण प्रत्यक्षात तीच पिकं कमी राहीली…कापूस सामान्य सांगीतला होता त्याचेही खूप कमी उत्पादन मिळाले..पावसाच्या आकडेवारीतही खुप तफावत आहे त्यामुळे याला कोनताही वैज्ञानिक आधार नाही त्यामुळे हि प्रथा बंद व्हावी असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने म्हटले आहे.