मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ; 1500 महिना या महिलांना मिळणार नाही..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ; महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे. या योजनेच्या शासन निर्णय (GR) आला असून या योजनेत कोणत्या महिला पात्र अपात्र आहेत याबाबत संपूर्ण माहिती स्पष्ट झाली आहे. खालील अटी मध्ये अडकलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेचा शासन निर्णय (GR) येथे पहा..
या महिला योजनेच्या लाभासाठी अपात्र….
1) ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
2) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
3) ज्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
4) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे 1500 रुपये पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/ सदस्य आहेत.
7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
वरील यादीतील नाव असलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.