रामचंद्र साबळे यांचा अंदाज ; या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार havaman aandaj
रामचंद्र साबळे ; महाराष्ट्रातील जुन महिण्यात पावसाचे असमान वितरण झाले. काही भागात अधिक तर काही भागात कमी असे पावसाचे स्वरूप होते.अनेक भागात शेतकऱ्यांना जोरदार व मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या आठवड्यात महाराष्ट्रावर 1002 हेप्टापास्कलचा हवेचा दाब राहील. या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 05/जुलैदरम्यान हवेचा दाब 1000 हेप्टापास्कल एवढा कमी होईल आणि या काळात राज्यातील पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. (Havaman aandaj today)
मान्सून हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये वेळेच्या आधीच पोहोचला आहे. (Monsoon news)
गेल्या आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मुंबईजवळील उच्च उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने वातावरण चांगले झाले. या चक्रिय वाऱ्याच्या प्रभावाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार ते मुसळधार पाऊस पहायला मिळाला चक्रीय वाऱ्यामुळे मराठवाड्यावर पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण झाल्यामुळे मराठवाड्यात पावसासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून मराठवाड्यात सार्वत्रिक पाऊस झालेला नाही. (Ramchandra sabale havaman aandaj)
हवामान विभागाने आज दि. 01/जुलै रोजी कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहिल – (हवामान विभाग पुणे होसाळीकर)
हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार दि. 05/जुलै पासून हवेचा दाब 1000 हेप्टापास्कलने कमी होईल आणि पावसाची तीव्रता वाढेल. (हवामान अंदाज रामचंद्र साबळे)