ला-निना सक्रिय होतोय ; जुलैमध्ये पाऊस कसा राहिल मृत्युंजय महापात्रा…
ला-निना सक्रिय ; जुनमध्ये एकंदरीत देशात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी कमी असे असमान पावसाचे वितरण जुनमध्ये पहायला मिळाले. जुनमध्ये असमान वितरणानंंतर जुलैमध्ये चांगल्या व सार्वत्रिक मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 01/जुलै रोजी हवामान खात्याने जुलैमधिल पावसाचा अंदाज वर्तवला असुन जुलै महिन्यात काही ठिकाणी सरासरी पेक्षा आधिक तर काही ठिकाणी सरासरीएवढा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणतात की जुनमध्ये सरासरी 165.3 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. परंतु यंदा जुन अखेर पावसाची सरासरी आकडेवारी पाहता 147.2 म्हणजे 89% एवढा पाऊस पडला. जुलैचा अंदाज देताना मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की बहुतांश भागात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर वायव्य भारत, ईशान्य भारताचा काही भाग व दक्षिण द्विपकल्पाच्या आग्नेय भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल.
1 Jul, जुलै 2024 च्या पावसाच्या शक्यतेचा अंदाज.
Most likely above normal over the country in July month.
: IMD https://t.co/BHhq1HRS7a— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 1, 2024
ला-निना सक्रिय होतोय – मृत्युंजय महापात्रा..
प्रशांत महासागरातील विषुववृत्तीय प्रदेशात सध्या (न्यूट्रल) सर्वसाधारण स्थिती आहे. पावसाच्या हंगामाच्या मध्यावर ला-निना सक्रिय होण्याचे संकेत आहे तर मान्सून अखेर ला-निना स्थिती तिव्र टप्प्यात जाणार आहे व हिंदी महासागरात इंडीयन डायपोल स्थिती असुन पुढे कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात जुनमध्ये पावसाचे असमान वितरण पहायला मिळाले तर जुलैमध्ये राज्यात सर्वाधिक व जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खान्देश मराठवाड्याचा उत्तर भागात सरासरी एवढा तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.