मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत बदल ; या अटी रद्द मुख्यमंत्र्यांची घोषणा…
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ; अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दर महिन्याला 1500 अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेत अनेक महिला अटी शर्ती मुळे अपात्र होणार असल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेतील काही जाचक अटी रद्द करण्याची घोषणा केली आहे.
लाडकी बहिण योजनेत अटी शर्ती मुळे लाखो महिला अपात्र होतील या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून आज पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महत्त्वाच्या अटी रद्द केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेतील या अटी रद्द केल्या आहेत..
🔴 महिलांना 21 ते 60 हि वयाची अट घातली होती आता हि वयाची अट 21 ते 65 पर्यंत वाढवली आहे.
🔴 एका कुटुंबात 05 एकापेक्षा जास्त जमीन असल्यास कुटुंबांतील महिला अपात्र होणार होत्या आता जमीनीची अट रद्द करण्यात आली आहे.
🔴 सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै एवढी होती यामध्ये वाढ करून आता 31 ऑगस्ट हि अर्जाची शेवटची तारीख केली आहे. अर्ज करण्यासाठी 2 महिने एवढा कालावधी असेल…
🔴 पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही.
🔴 लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.
🔴 कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगटऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला,… https://t.co/e6k2Q4w9wl
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2024
\’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण\’ योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा आता ६५ वर्ष करण्यात येत असल्याची आणि पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज विधानसभेत केली. जनतेचा विचार, विकास आणि विश्वास ही आमच्या वाटचालीची त्रिसूत्री असल्याचेही… https://t.co/6rFOV7rYCV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2024
वरील दोन्ही अटीमुळे अपात्र असलेल्या महिलांना आता योजनेत सहभागी होता येणार आहे. तसेच अर्ज करण्यासाठी कोणतीही अंतिम तारीख नसावी यासाठी विरोधी पक्षांकडून तसेच महिलांकडून मागणी केली जात आहे याबद्दल सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. तरी महिलांना मोठा दिलासा देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील दोन अटी रद्द केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केलेली घोषणा YouTube video पहा..