पीकविमा भरण्याची शेवटची तारीख आली ; लवकर नोंदणी करा…
पीकविम्याची नोंदणी; प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. खरीप 2024 साठी पिकविमा नोंदणी सध्या सुरू आहे. पिकविमा योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 15/जुलै/2024 ही खरीप 2024 पीक विम्याची नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे.
शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता पीक विमा योजनेत लवकर सहभागी व्हावे. गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने पिकविमा योजनेला अवघ्या एक रुपयात मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ता राज्य सरकार भरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे फक्त एक रुपयाचा विमा हप्ता असेल.
शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी फक्त एक रुपया भरावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. विमा कंपनी सीएससी केंद्र चालकाला प्रत्येक पिकविमा नोंदणी फार्म चे पैसे देते, तरीही पीक विम्यासाठी तुमच्याकडून जास्त शुल्क आकारले जात असल्यास तुम्ही तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीवर कृषी विभाग तात्काळ कारवाई करेल.
15/जुलै ही खरीप पीक विमा 2024 अंतर्गत पीक विमा भरण्याची अंतिम तारीख असली तरी, पीक विमा नोंदणी त्वरित पूर्ण करावी. (कृषी मंत्री धनंजय मुंडे)