Ration news ; शिधापत्रिका धारकांसाठी खुशखबर पुरवठा विभागाचा मोठा निर्णय…
Ration news ; रेशन धान्य वितरणात रेशन दुकानदार अनेक ठिकाणी कमी धान्य देतात आणि जास्त पैसे घेतात तर काही ठिकाणी रेशन देत नाहीत. हे सर्व गैरव्यवहार (काळा बाजार) थांबवण्यासाठी आणि धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांना रास्त रेशन मिळावे यासाठी पुरवठा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता रेशनधारकांना रेशनची माहिती मोबाईलवर मेसेजद्वारे मिळणार आहे. (अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य छगन भुजबळ)
पुरवठा विभागाने शिधापत्रिका आणि मोबाईल क्रमांक लिंक करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत कुटुंबातील एका सदस्याचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेशी जोडला जाणार आहे. या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार धान्य खरेदीची माहिती मिळेल. तसेच पुरवठा विभागाकडून किती धान्य आले आणि राशन दुकानदाराने किती वाटप केले हेही तपासता येते. रेशनचे वाटप कधी होणार याची माहिती काही दिवसांपूर्वी मेसेजद्वारे दिली जाणार आहे. (Maharashtra government designe)
महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मोबाईल क्रमांक रेशनकार्डला जोडण्यासाठी राशन धारकांना अवाहन केले आहे. आतापर्यंत 01 कोटी 24 लाख रेशनकार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याचे काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी आणि रेशनची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी तुमचे रेशन कार्ड मोबाईल क्रमांकाशी लवकर लिंक करा. (अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य छगन भुजबळ)