शिंदे सरकारकडून महिलांसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आणखी एक खूशखबर

\"शिंदे

शिंदे सरकारकडून महिलांसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आणखी एक खूशखबर

 

मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज भरण्याचे कामाला राज्य सरकारने अर्जाची अंतिम मुदत ३१/ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अनेक महिलांचे नाव राशन कार्ड मध्ये नसल्याने त्या महिलांना शिधापत्रिका आणि इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या कडक सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत.

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन या योजनेसाठी महिलांच्या राशन कार्डातील नावे कमी करण्याची आणि समाविष्ट करण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट पर्यंत फ्रि करण्यात आली आहे. शिधापत्रिकेत नाव कमी करणे आणि जोडण्यासाठी 33 रुपये शुल्क आकारले जाते हे शुल्क आता लागणार नाही. महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच पुरवठा विभागासह सर्व शासकीय यंत्रणांना याबाबत पुढील सूचना दिल्या आहेत.

\"\"

1) \’मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीन\’ योजनेसाठी रेशनकार्ड त्वरित देण्यात यावे.

 

2) रेशनकार्ड संबंधित कामात उशीर किंवा गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.

 

3) ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व गतिमान होण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांनी नियंत्रण ठेवावे.

 

4) रेशनकार्डसह आवश्यक कागदपत्रे देण्यास विलंब झाल्यास किंवा पैशाची मागणी केल्यास संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी.

 

5)महिला भगिनींना आवश्यक कागदपत्रांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही, याबाबत नियोजन करावे.

 

🔵 लाडक्या भगिनींना कोणत्याही कारणाने अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.

 

मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून शासकीय विभागांकडून त्याचे काटेकोर पालन अपेक्षित आहे. जेणेकरून महिला भगिनींना योजनेसाठी अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे महिला भगिनींना निश्चितच दिलासा मिळेल आणि योजनेचा लाभ घेणे सोपे जाईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top