आजचा हवामान अंदाज या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याचा इशारा
आजचा हवामान अंदाज ; राज्यात कोकण विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत असून, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने उद्या दि. 07 जुलै रोजी विदर्भात कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर आणि संपूर्ण कोकणसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याचे निवृत्त तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज अत्यंत कमी आहे.