Rain marathwada ; या कारणामुळे मराठवाड्यात पाऊस कमी हवामान तज्ञाचा अंदाज…
Marathwada rain ; मोसमी पावसाचा पहिला महिना म्हणजे जुन महिना संपला असुन अजून राज्यात सार्वत्रिक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून यंदा मोसमी वारे मुंबईकडून आल्याने मराठवाडा प्रदेशात पर्जन्यछायेच्या प्रभावाने पावसाचे प्रमाण कमी राहिले व बहुतांश भागात जुन मध्ये पावसात खंड पडला असे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.
मान्सून दाखल होताच मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला हा पाऊस जोरदार बरसत राहिल अशी अपेक्षा होती परंतु प्रतिकुल परिस्थिती मुळे पावसात खंड पडला. ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम पावसाच्या सरी बरसल्याचे चित्र होते. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी पावसात सार्वत्रिक आणि सातत्य नव्हते. काही ठिकाणी ढगफुटी झाली तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला.
हे वाचा – राशन धारकांना खुशखबर पुरवठा विभागाचा मोठा निर्णय मंत्री छगन भुजबळ
यंदा भारतीय मान्सूनचा पहिला झोत अरबी समुद्रातून म्हणजे मुंबईतुन आला. मोठ्या पावसाचे ढग सह्याद्रीच्या पर्वतरांगात अडकून त्याचे सांद्राकरण होऊन तिथे पाऊस जास्त झाला. सह्याद्रीच्या पुढे हलक्या पावसाचे ढग येवून बरसतात त्या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात.
जुन महिन्यात मराठवाड्यात पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण झाल्याने जास्त पाऊस पडला नसल्याचे हवामान तज्ञ डॉ. मदन सुर्यवंशी यांनी सांगितले आहे. कर्नाटक गोव्यातून मध्य महाराष्ट्रातुन मान्सून पुढे आला तर मराठवाड्यात समाधान कारक पाऊस पडतो असेही त्यांनी सांगितले आहे.लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता (1500 रुपये) कधी येणार तारीख फिक्स
हे वाचा — लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता (1500 रुपये) कधी येणार तारीख फिक्स
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार तारीख निश्चित