Mukhymantri Vayosri yojna ; मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज सुरू
Mukhymantri Vayosri yojna ; राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत त्यांच्या शारीरिक अपंगत्व आणि दुर्बलतेनुसार सहाय्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री व्योश्री योजना सुरू केली आहे. या योजनेत व्यक्तीने ६५ वर्षे पूर्ण केली असतील आणि वयामुळे शारीरिक दुर्बलता असेल तर चष्मा, श्रवणयंत्र, व्हील चेअर, फाल्डिक वॉकर, कडोम चेअर, निब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी उपकरणे खरेदी करण्यासाठी 3000 थेट बॅक खात्यात जमा केले जातील.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून सहाय्यक आणि समाजकल्याण विभागाकडे अर्ज दाखल करता येणार आहे या अर्जासाठी आधार कार्ड किंवा मतदार कार्ड, बॅक पासबुक, पासपोर्ट साईज 2 फोटो आणि स्वयं घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. (Mukhymantri Vayosri yojna online registration)
या योजनेसाठी सहाय्यक आणि समाज कल्याण विभागामार्फत अर्ज अर्ज भरता येणार असून काही जिल्ह्यांमध्ये १५/जुलै तर काही जिल्ह्यांमध्ये १५/ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. जर तुम्ही मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या शासन निर्णयाच्या अटीं शर्तीनुसार योजनेच्या लाभासाठी पात्र असाल तर तुम्ही सहाय्यक आणि समाज कल्याण विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह तुमचा अर्ज करू शकता. (Maharashtra government scheme 2024)
शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र आणि कोण अपात्र आहे ते पाहण्यासाठी योजनेचा शासन निर्णय (GR) पहा
मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल अधिक माहितीसाठी खालील YouTube व्हिडिओ पहा. (Mukhymantri Vayosri yojna)