रेशनकार्ड न्यूज महाराष्ट्र ; या नागरिकांना पुराव्याशिवाय मिळणार रेशनकार्ड छगन भुजबळ

\"रेशनकार्ड

रेशनकार्ड न्यूज महाराष्ट्र ; या नागरिकांना पुराव्याशिवाय मिळणार रेशनकार्ड छगन भुजबळ…

 

रेशन न्यूज महाराष्ट्र ; भटक्या समाजासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भटक्या जमातींकडे ओळखपत्र व वास्तव्याचा पुरावा नसल्याने त्यांना रेशनकार्ड काढण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे भटक्या विमुक्तांना शिधापत्रिका काढण्यासाठी ओळखपत्र व रहिवासी पुराव्याची अट रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुराव्यांची अट रद्द झाल्यामुळे या नागरिकांना रेशनकार्ड मिळणे सोपे होणार आहे. (मंत्री छगन भुजबळ महाराष्ट्र)

 

भटक्या विमुक्त नागरिकांना नवीन शिधापत्रिका देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून या नागरिकांना शिधापत्रिकांचे वाटप करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. शिधापत्रिका मिळाल्यानंतर या नागरिकांना राष्ट्रीय सुरक्षा योजना व शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळणार आहे. (Ration news)

भटके, विमुक्त समाजातील बांधवांच्या सन्मानासाठी व हितासाठी सरकारचा निर्णय!

भटके, विमुक्त जमातीतील कडे ओळखपत्र व वास्तव्याचा पुरावा नसल्याने त्यांना शिधापत्रिका मिळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी आपल्या प्रयत्नांतून त्यांना रेशनकार्ड मिळण्यासाठी ओळखपत्र व… pic.twitter.com/cWtPTqLJWt

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) July 7, 2024

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भटक्या विमुक्त नागरिकांकडे मतदार ओळखपत्र, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किंवा भटक्या समाजाचे नागरिक असल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, नगरसेवक किंवा सरपंचाने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतीही कागदपत्रे असल्यास त्यांना नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करता येणार आहे. हि माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. (Ration big news maharashtra)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top