रामचंद्र साबळे 11/जुलै हवामान अंदाज या भागात मध्यम पावसाचा अंदाज….
रामचंद्र साबळे ; जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी आज दि. 11/जुलै रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 01/जुलै ते 10/जुलै दरम्यान नंदुरबार, गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली या जिल्ह्यात सरासरी पेक्षा 34% कमी पावसाची नोंद झाली. उर्वरित सर्व जिल्ह्यात सरासरी एवढा ते सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
रामचंद्र साबळे यांनी 11/जुलै ते 13/जुलै दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा आहे याबाबत माहिती दिली आहे पाहूया..
रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, लातूर, नागपूर, नांदेड, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, वाशीम या जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे
नगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, धाराशिव, सातारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
सांगली नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, सांगली या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.