Mukhymantri mazi ladki bahin yojna online registration लाडकी बहिण योजनेचा फॉर्म कसा भरावा

\"Mukhymantri

Mukhymantri mazi ladki bahin yojna online registration लाडकी बहिण योजनेचा फॉर्म कसा भरावा

Mukhymantri mazi ladki bahin yojna online registration ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा फॉर्म नारी शक्ती या ॲप्लिकेशन वरून घरबसल्या मोबाईलवरून कसा भरायचा, तुम्ही खालील स्टेप बाय स्टेप पद्धतीने भरू शकता लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरू शकता. तसेच अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची सविस्तर माहिती पाहू.

🔴 सर्व प्रथम प्ले स्टोअर वरून नारी शक्ती दुत हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा.

🔴 मोबाईल नंबर, ओटीपी आणि नियम आणि अटींवर क्लिक करून लॉग इन करा प्रोफाइल अपडेट पर्यायावर क्लिक करा.

🔴 पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार ही सर्व माहिती भरा.

🔴 नारी शक्ती दुत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या पर्यायावर क्लिक करा.

🔴 ॲप्लिकेशन ला लोकेशनची परवानगी द्या. लाडकी बहिन योजनेचा फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये आधार कार्डची माहिती भरा

(संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक)

🔴 तसेच तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती भरा, इतर योजनेचा लाभ घेत नसल्यास \’नाही\’
या पर्यायावर क्लिक करा.

🔴 वैवाहिक स्थिती टाका स्त्रीच्या विवाहापूर्वीचा समावेश पूर्ण नाव टाका

🔴 महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर \’होय\’ किंवा \’नाही\’ परराज्य ड्रॉपडाउन मधून होय ​​निवडा.

🔴 अर्जदाराचे बँक तपशील खाते क्रमांक, बँकेचे नाव, IFSC क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे की नाही याचा तपशील भरा.

🔴  आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँकेचे पासबुक आणि महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास ते त्याचा दाखला हि सर्वसर्व कागदपत्रे अपलोड करा.

🔴  कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करावे. मोबाईल कॅमेऱ्याने महिला अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढणे आणि अपलोड करणे आवश्यक आहे.

🔴  या योजनेसाठी Accept हमीपत्र डिस्क्लेमर वर क्लिक करा अटी व शर्ती मान्य करा. सबमिट फॉर्म बटणावर क्लिक केल्यानंतर तयार होणारा OTP प्रविष्ट करा.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता घरबसल्या भरता येणार!

राज्यातील पात्र महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सरकारकडून कागदपत्रे व इतर अटींमध्ये मुभा देण्यात आली आहेच. पण त्याचबरोबर आता \’नारीशक्ती दूत\’ या अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या देखील… pic.twitter.com/l3bBpRL2iO

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) July 11, 2024

 

अशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहिण योजनेचा फॉर्म घरबसल्या आपल्या मोबाईल वरुन भरू शकता. अर्ज भरताना कुठेही चुक करू नका तसेच अर्ज भरताना मोबाईलला चांगले नेटवर्क असावे. माहिती इतरांना नक्की शेअर करा आणि नवनवीन माहिती साठी आपल्या व्हाटसॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद…

 

\"\"

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top