Ladka bhau yojna या तरुणांना मिळणार 10000 रूपये महिना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Ladka bhau yojna ; आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि. 17/जुलै रोजी पंढरपूर येथे महा पूजेसाठी गेले होते. महापूजा आटोपल्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. 12 वी पास तरुणांना 6000 रूपये डिप्लोमा तरुणांना 8000 रूपये आणि डिग्री केलेल्या तरुणांना 10000 रूपये दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ कोणत्या तरुणांना मिळणार तसेच योजनेची संपूर्ण माहिती पाहुया.
अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली असता लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न विरोधकांनी केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी सुद्धा घोषणा केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. तरी कुशल कामगार निर्माण करण्यासाठी अप्रेन्टिसशिप करणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेचा शासन निर्णय पहा (अटी/शर्ती) सविस्तर माहिती
या योजनेचा लाभ फक्त शिक्षण पूर्ण करून अप्रेन्टिसशिप करणाऱ्या तरुणांना मिळणार आहे. अप्रेन्टिसशिप पुर्ण झाल्यावर त्यांना अनुभवाच्या जोरदार कुठेही नोकरी मिळेल आणि बेरोजगारी कमी होण्यासाठी मदत होईल. अप्रेन्टिसशिप करणाऱ्या तरुणांना 12/पास 6000 रूपये डिप्लोमा/ 8000 रूपये आणि डिग्री/ 10000 रूपये असे स्टायंफड देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ कोणालाही मिळणार नसुन फक्त शिक्षण पूर्ण करून अप्रेन्टिसशिप करणाऱ्या तरुणांना मिळणार आहे. सदर योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. लाडका भाऊ योजना ; तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन निर्णय आला