रामचंद्र साबळे हवामान today – पावसाचा जोर वाढनार, या जिल्ह्यात मुसळधार
रामचंद्र साबळे हवामान अंदाज today – हवामानतज्ञ रामचंद्र साबळे यांनी या आठवड्यात पावसाचा जोर वाढनार आसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर या आठवड्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील सविस्तर अंदाज आपण या लेखातून पाहूयात..👇
या आठवड्यात महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल, तर बंगालच्या उपसागरावर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, त्यामुळे बंगालच्या उपसागराची मान्सून शाखा कार्यरत होईल, वारे पूर्वेकडून उत्तरेस व नंतर पश्चिमेस व उत्तरेस वाहतील. तसेच अरबी समुद्रावरुण नैऋत्य दिशेने वाहणारे वारे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातच्या दिशेने वेगाने वाहतील, आणि त्याही दिशेने मॉन्सून उत्तरेच्या दिशेने पुढे वाटचाल करत राहील.
रामचंद्र। साबळे यांनी दिलेल्या माहीतीनुसार या आठवडयात चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकणात मुसळधार स्वरूपात, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार स्वरूपात पावसाची शक्यता राहील.
मराठवाडयात मध्यम स्वरूपात तर काही दिवशी अल्पशा प्रमाणात पाऊस होईल, विदर्भात मध्यम स्वरूपात तर पश्चिम महाराष्ट्रात काही दिवशी जोरदार, तर काही दिवशी पावसात उपडीप राहील. कोकण वगळता इतर सर्व विभागांत काही दिवशी पावसात उपडोप राहण्याची शक्यता आहे. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वान्याची दिशा पश्चिम व मध्य विदर्भात वायव्येकडून राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील.
नाशिक, धुळे, नंदूरबार धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, वाशीम, सांगली, सोलापूर, पुणे व नगर विल्ह्यांत वान्याचा ताशी वेग २२ ते २८ किमी राहील अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे विषुववृत्तीय भागातील तापमान १५ ते २३ अंश सेल्सिअस इतके घसरले असून हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. त्यामुळे \’ला-निना\’चा प्रभाव वाढला आहे. या वरून महाराष्ट्रातील काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.