लाडकी बहीण योजनेत आता पुन्हा एकदा 6 मोठे बदल, लगेच पहा..
लाडकी बहीण योजनेत आता पुन्हा एकदा काही बदल करण्यात आले होत्या या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळावा असा सरकारचा प्रयत्न आसून योजना घोषीत झाल्यापासून आता पर्यंत या योजनेत अनेक अटी शर्तींमध्ये शिथिलता आणण्यात आली आहेत. जेणे करून महिलांसाठी अर्ज करणे सुलभ होईल.
या योजनेत कागदपत्रांबाबत अजूनही काही अडचणी येत होत्या याबाबत सरकारने दखल घेतली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लाडकी बहिण योजनेत आता 6 नवे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र महिलांसाठी अर्ज करणे अधिक सुलभ होणार आहे.
लाडकी बहिण योजनेतील 6 नवे बदल खालीलप्रमाणे
1) पोस्ट बँक खाते असल्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरणार
2) दुसऱ्या राज्यातील महिलेने महाराष्ट्रातल्या पुरूषा बरोबर लग्न केल्यास पतीच्या कागदपत्रावर तिला लाभ मिळेल
3) गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार, त्यात बदलही केले जाणार
4) केंद्राच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही यापुढे लाभ मिळणार
5) नवविवाहीत महिलेची नोंदणी शक्य नसेल, तर पतीचे रेशन कार्ड ग्राह्य धरले जानार
6) ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येणार
लाडकी बहिण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे, आणि या नव्या बदलामुळे अर्ज करण्यात आनखी सुलभता येनार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.