Ajit pavar – म्हणाले जर… तर… लाडकी बहिन योजना बंद होईल – अजित पवार
Ajit pavar – अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे या योजनेची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सरकार सुद्धा या योजनेबाबत स्वतःला शाबासकी देण्यात व्यक्त आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून लोकसभा निवडणुकातील पराभव लक्षात घेता लाडकी बहिन योजना जाहीर करण्यात आली आहे. ही योजना किती काळ चालेल यावर अनेकजण आपापले अंदाज लावत आहेत. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना लाडकी योजना किती दिवस चालणार याची माहिती दिली आहे.
लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज भरण्यास ०१/जुलैपासून सुरुवात झाली असून या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१/ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल येणे बाकी आहे. सध्या नारी शक्ती ॲप्लिकेशन वरुन ऑनलाईन अर्ज व अंगणवाडी सेविका यांच्या कडे ऑफलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे.
या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. ऑगस्टमध्येही अर्ज केल्यास जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या आधार लिंकसह बँक खात्यात जमा होतील, असे सांगण्यात येत आहे. अधिकाधिक महिलांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी योजनेतील अनेक अटी माफ करण्यात आल्या आहेत
तर… लाडकी बहिन योजना बंद होणार – अजित पवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार निवडून आले पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार पडल्यास दुसरे सरकार लाडकी बहिन योजना बंद करू शकते. लाडकी बहिन योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे सरकार निवडून आणू, असे अजित पवार म्हणाले. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पवार यांनी आतापासूनच सुरूवात केल्याचे यावरून दिसून येते.