Cotton msp 2024 ; यंदा कापसाला किती हमीभाव मिळाला..
Cotton msp 2024 ; केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यासह 19 जुन रोजी केंद्र सरकारने मंत्रीमंडळाची बैठक घेतली या बैठकीत खरीप हंगामातील 14 पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आले. या 14 पिकांच्या हमीभावात काही प्रमाणात वाढ झाली आहे. मराठवाडा विदर्भाचे प्रमुख पिक असलेल्या कापसाला सरकारने किती हमीभाव जाहीर केला तसेच मागिल वर्षीच्या तुलनेत किती वाढ केली पाहुया.
कापसाचा उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झाल्याने तसेच मजुरांची मोठी समस्या असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किमान 10 हजार रुपये क्विंटल ची अपेक्षा होती परंतु केवळ 501 रुपयाचा हमीभाव वाढवून केंद्र सरकारने 7521 रूपये एवढा हमीभाव जाहीर केला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.
कापसासोबत ईतर 14 पिकाच्या हमीभावात किती वाढ केली हे पाहण्यासाठी खालील लेख पहा..