Cotton spre ; कापूस पहिला फवारणी ; मावा तुडतुडे नियंत्रणासाठी हि करा फवारणी

\"Cotton

Cotton spre ; कापूस पहिला फवारणी ; मावा तुडतुडे नियंत्रणासाठी हि करा फवारणी

 

Cotton spre ; महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असून राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी आता कापसाच्या आंतर मशागतीची कामे करत आहे. कपाशीची पहिली फवारणी 15 दिवसांनी करावी. या फवारणीमध्ये मावा तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी.

कापूस पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी वेळेवर फवारणी करणे आवश्यक आहे. वेळेवर फवारणी केल्याने कपाशीचे पीक जोमदार व निरोगी राहते. आणि आपले उत्पादन वाढते. परंतु आता कापूस पिकावर पहिली फवारणी कोणती करावी जेणेकरून कीड व रोग नियंत्रणाचे पद्धतशीर नियंत्रण करता येईल.

कापूस पिकावर पहिली फवारणी कधी करावी.

कापूस लागवडीनंतर पहिली फवारणी कधी करावी याबाबत अनेक शेतकऱ्यात संभ्रम आहे. मात्र, कापसाची पहिली फवारणी उगवणीनंतर २५ दिवसांच्या आधी करावी. परंतु पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन फवारणीचे नियोजन करावे. लागवडीनंतर लगेचच कपाशीवर मावा तुडतुडे व पांढरी माशी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून या किडीच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी करावी लागते.

पहिल्या फवारणीसाठी कोणते कीटकनाशक निवडावे?

कापूस पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत आढळणारे रोग म्हणजे पांढरीमाशी, मावा,तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी कोणत्याही महागड्या औषधांची गरज नाही. या किडींच्या नियंत्रणासाठी पहिल्या फवारणीसाठी खालील औषधांची निवड करावी.

1) lmidacloprid 17.8% (10 मिली) + 19-19-19 (100 ग्रॅम)

2) thimathoxam 25% (10 मिली) + 19-19-19 (100 ग्रॅम)

फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी?

१) फवारणी करत असताना चेहऱ्यावर रुमाल किंवा मास्क लावा.

2) फवारणी करताना अनेक शेतकरी औषधाची मात्रा वाढवतात किंवा कमी करतात त्यामुळे पिकावर स्काॅर्चिग येण्याची शक्यता असते त्यामुळे औषधाची मात्रा कमी किंवा वाढवु नये.

3) फवारणी करताना चांगल्या प्रतीचे स्टिकर वापरणे आवश्यक आहे म्हणजे फवारणीचे चांगले रिझल्ट मिळतात.

4) दुपारनंतर फवारणी करणे शक्यतो टाळावे.

5) फवारणी करताना वापरलेल्या पंपाने प्रथम कोणत्या औषधाची फवारणी केली हे पाहावे. पंपाने फवारणी करायची असेल तर आधी पंप चांगला धुवावा.

6) फवारणीसाठी औषधे निवडताना कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

7) औषधाच्या पॅकेटवरील लेबल वाचणे आवश्यक आहे.

शेतकरी मित्रांनी फवारणी करताना वरील सूचना लक्षात ठेवाव्यात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top