Cotton spre ; मावा तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी कापसावर दुसरी फवारणी कोणती करावी…
Cotton spre ; कापसाला सरासरी दिड महिना पूर्ण झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे कपाशी पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच कपाशीवर या अवस्थेत कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असतो. कापसाला या अवस्थेत किडीच्या नियंत्रणासाठी आणि चांगल्या वाढीसाठी कोणती फवारणी करावी, याची संपूर्ण माहिती पाहुया.
कापसाच्या चांगल्या उत्पादनासाठी नियमित फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. कापसाच्या दुसऱ्या फवारणीच्या वेळी कीटकनाशका सोबत विद्राव्य खत किंवा टॉनिकचा वापर करावा, जेणेकरून पिकाची एकूण गुणवत्ता सुधारेल पिकाची वाढ चांगली होईल आणि उत्पादनात वाढ होईल.
कापूस पिकांवर फवारणी करताना काळजी घ्या.
🔴 फवारणी करताना औषधाची मात्रा वाढवू किंवा कमी करू नका.. कंपनीने सांगितल्यानुसार औषधाची मात्रा वापरा…
🟣 फवारणी करताना जास्त प्रमाणात औषध एकत्र फवारू नये…
🔵 पावसाचे पाणी व जास्त काळ साठलेले पाणी फवारणीसाठी वापरू नये.
🟠 सध्या दुपारनंतर पाऊस पडत आहे, त्यामुळे फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा.
🟡 किटकनाशके, विद्राव्य खते, टॉनिक (औषध) निवडताना कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला घ्या.
कापसाला दुसरी फवारणी करताना कोणते औषध निवडायचे आणि औषधे किती प्रमाणात घ्यावी तसेच फवारणी कोणती काळजी घ्यावी हे खाली दिलेल्या YouTube व्हिडिओ मध्ये सविस्तर पहा.