Crop insurance scheme खरिप 2023 साठी 7280 कोटी रुपये विमा मंजूर कृषीमंत्री धनंजय मुंडे
Crop insurance scheme ; गेल्या वर्षी एक रूपयांत पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. एक रूपयांत पिक विमा योजनेत आतापर्यंत सर्वाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. मागील वर्षी दुष्काळ पडल्याने पिकांना मोठा फटका बसला होता. नैसर्गिक आपत्तीने नूकसान झालेल्या पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 7280 कोटी रुपये पिक विमा मंजूर केला असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात व पिक कापणी प्रयोग असे एकूण मंजूर झालेल्या पिकविम्यापैंकी (7280) आतापर्यंत 4271 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. उर्वरित 3009 कोटी रुपये वाटप प्रक्रिया सध्या सुरू आहे. पिक कापणीच्या अंतीम अहवालानुसार या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.
पिक विमा योजनेचा देशात सर्वात जास्त पिक विमा महाराष्ट्राला मिळाला असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. तसेच आतापर्यंत सर्वात जास्त (7280 कोटी) पिक विमा मिळाला आहे असेही ते म्हणाले आहे.
तुम्हाला 2023 चा पिक विमा मिळाला का हे तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करु शकता. यामध्ये कोणत्या पिकासाठी किती पिक विमा मिळाला, कोणत्या बॅंकेत आला, कधी आला याची संपूर्ण माहिती पाहता येईल.
2023 चा पिक विमा मिळाला का ऑनलाईन चेक करा आपल्या मोबाईल वर
Pikvima pement status पिकविमा मिळाला का चेक करा ऑनलाईन मोबाईलवर