Cyclone remal ; मान्सूनच्या प्रगतीत चक्रीवादळाचा अडथळा, पहा काय होनार परिणाम
Cyclone remal ; मंडळी, बंगालच्या उपसागरात काल बुधवारी चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. उद्या २४ मेपर्यंत हे \’रेमाल\’ चक्रीवादळ पूर्णपणे तयार होईल आणि हे वादळ किनारपट्टीच्या दिशेने प्रवास सुरू करेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. या वादळामुळं मान्सूनच्या प्रवासाला फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, \’रेमाल\’ चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वादळी वातावरणामुळे ओडिशा व बंगालला मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ २४ मे रोजी पूर्ण विकसित होणार असून, त्यानंतर त्याची आगेकूच सुरू होईल. या चक्रीवादळामुळं ज्या वेगानं मान्सूनची आगेकूच सुरू होती, त्यात अडथळा निर्माण होऊन फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?
चक्रीवाळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशात पावसाचा ईशारा देन्यात आला आहे . महाराष्ट्रात याचा फारसा प्रभाव दिसणार नसून महाराष्ट्राला कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. स्थानिक वातावरणामुळे येत्या दोन ते तीन दिवसात अवकाळी पावसाचा अंदाज महाराष्ट्रात देण्यात आला असून काही भागांत उष्णतेची लाट येन्याचा अंदाज आहे.