Cyclone remal News ; महाराष्ट्रात उष्णतेची लाट कधीपर्यंत ? चक्रीवादळाचा राज्यावर काय परिणाम?
एकीकडे चक्रीवादळ (Cyclone remal) आणि दुसरीकडे मान्सुनही (monsoon 2024) पुढे वाटचाल करतोय,यामुळे देशातील काही राज्यात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवन्यात आली आहे. मात्र उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम राहील अशी शक्यता व्यक्त करन्यात आली आहे.
महाराष्ट्रासह उत्तर भारतातील, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यात गर्मी आणि उष्णतेची लाट कायम आसनार आहे. खासकरून राजस्थानमध्ये तापमान 50℃ पर्यंत जाईल अशी शक्यता आहे.
महाराष्ट्रातही उष्णतेच्या झळा असह्य झाल्या आसून विदर्भ मराठवाड्यातील तापमान 45℃ पर्यंत गेले आहे. भयंकर गर्मी आणि उष्णतेमुळे सर्वच जन हैराण झाले आहेत. आवकाळी पावसानंतर अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
आजही उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार,जळगाव या जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे, तर विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा आणि काही ठिकाणी आवकाळीचा अंदाज व्यक्त करन्यात आला आहे.
Cyclone remal News चक्रीवादळ या ठिकाणी धडकनार..
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आज आनखी तीव्र होनार आसून उद्या रौद्ररूप धारण करेल.27 तारखेला हे चक्रीवादळ बंग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या सिमेजवळ हे चक्रीवादळ धडकन्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात उष्णतेची लाट कधीपर्यंत ?
प्रचंड गर्मीमुळे शेतकरी आणि नागरिकांना कधी पाऊस पडतो आणि गर्मी कमी होते असं झालंय. मान्सून केरळमध्ये 31 मे किंवा 1 जून रोजी दाखल होईल अशी शक्यता आहे. त्यानंतर केरळ,तामिळनाडू, कर्नाटक परिसरात जोरदार पाऊस पडेल आणि मान्सूनची महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू होईल. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातही उष्णता कमी होन्यास सुरुवात होईल.