Forecast weather ; या जिल्ह्यात आजपासून पुन्हा मुसळधार पावसाचा जोर वाढणार आहे.
Forecast weather ; गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक भागात उघाड दिली आहे. परंतु आजपासून (12/जुलै/2024) राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. (Havaman aandaj today maharashtra)
आज {१२/जुलै} रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, ठाणे, संपूर्ण मुंबई जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे आणि या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच पालघर, नाशिक, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/wSBajCj8k2
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 11, 2024
विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra weather forecast)
कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून येत्या चार दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही माहिती इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि नवीन माहिती आणि दररोजच्या तज्ञाचे हवामान अंदाज पाहण्यासाठी आमच्या whatsaap ग्रुपमध्ये सामील व्हा. (Weather forecast today)
उत्तर कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 11, 2024