Havaman aandaj ; विदर्भ मराठवाड्यात पाऊस कधी पासून सक्रिय होणार
Havaman aandaj ; राज्यात 20 जुन पासुनमान्सूनने पुन्हा वेग धरला आहे. कोकणात पाऊस सक्रिय झाला असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे सांगितले जातय. शेतकरी मोठ्या व सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षेत आहेत परंतु जोरदार व मोठ्या पावसासाठी आणखी आठवडाभर वाट पहावी लागणार असल्याचे हवामान विभाग तज्ञ मेधा खोले यांनी सांगितले आहे.
डॉ मेधा खोले यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 30/ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आणि 06 जुन रोजी महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोहोचला व 09 जुन ला मान्सून मुंबई पुणे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यापर्यत विस्तारला. परंतु 01/जुन ते आतापर्यंत अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात एकही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नाही त्यामुळे मान्सूनचा जोर मागे ओसरला होता.
विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र भागात पाऊस कधीपासून सक्रिय होणार – मेधा खोले…
कोकणात 22/ जुन पासुन पाऊस सक्रिय होत असल्याचा अंदाज आहे परंतु मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सक्रिय होण्यासाठी 24 ते 25 जुन पर्यंत वाट पहावी लागणार आहे. तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे हवामान विभाग संचालिका डॉ मेधा खोले यांनी सांगितले आहे.
24/जुन पासुन मराठवाडा विदर्भात पाऊस आजपासून सक्रिय होईल असे हवामान विभागाच्या संचालिका डॉ मेधा खोले यांनी सांगितले आहे.