Havaman andaj ; या आठवड्यात राज्यात पुर्वमोसमी पाऊस होनार सक्रिय, आज या जिल्ह्यात पाऊस
राज्यात पुर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आसून या आठवड्यात विदर्भ मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या आठवड्यात वादळी वारे आणि विजांसह गडगडाटी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा ईशारा देन्यात आला आहे.
आजपासून होईल असा अंदाज आहे, त्याअगोदर राज्यात पुर्वमोसमी पाऊस हजेरी लावनार आहे अशी शक्यता आहे.
येत्या काही तासात नागपूर, भंडारा, वर्धा, आणि वाशीम या जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज आहे, सोबतंच अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात आवकाळीचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात कालपासून वातावरणात बदल झाला आहे, कालही काही ठिकाणी आवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे.. आज मात्र विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर आनखी वाढन्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.