July weather forecast ; पावसात खंड पडण्याची कारणे ; जुलैमध्ये पावसात खंड पडणार रामचंद्र साबळे…
डॉ रामचंद्र साबळे यांनी मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवला तेव्हा हवामान बदलांमुळे जुन जुलैमध्ये पावसात खंड
July weather forecast ; जुन महिना संपत आला असून जुन मध्ये पावसाचे असमान वितरण आपल्याला पाहायला मिळाले. जुन मध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसात खंड पडला तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला व काही ठिकाणी समाधान कारक पाऊस पहायला मिळाला. डॉ रामचंद्र साबळे म्हणतात हे असमान पावसाचे वितरण होण्यामागे जागतिक हवामानात होत असलेल्या बदलामुळे हे सर्व होत आहे.
हवामान बदलांमुळे एका जिल्ह्यात एका बाजूला जोरदार पाऊस तर दुसऱ्या बाजूला पावसात खंड अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुन महिण्यात सुद्धा राज्यात पावसाचे असमान वितरण पहायला मिळाले.
डॉ रामचंद्र साबळे यांनी मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवला तेव्हा हवामान बदलांमुळे जुन जुलैमध्ये पावसात खंड पडणार असल्याची माहिती दिली होती. पुढे जुलैमध्ये सूद्धा ठिकठिकाणी पावसात खंड पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 01/जुलै रोजी साबळे जुलैमध्ये पाऊस कसा राहील याबाबत सुधारित अंदाज सादर करणार आहेत.
मुंबई, कोकणात ठिकठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. सविस्तर अंदाज पाहण्यासाठी खालील YouTube video पहा…