July weather forecast ; जुलैमध्ये या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज
July weather forecast ; मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असून अनेक भागात अतिवृष्टी सदृश पाऊस पडला. मात्र जूनमध्ये पावसाचे असमान वितरण झाल्याने शेतकरी मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलै महिन्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या महिन्यात राज्यातील हवामान कसे असेल, तापमान आणि पावसाचा अंदाज कसा असेल, याची माहिती हवामान खात्याचे निवृत्त तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
लेह, लडाख, पूर्व तामिळनाडू आणि पूर्वेकडील 07 राज्ये वगळता संपूर्ण देशात 106% पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच, महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. माणिकराव खुळे म्हणतात की संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाची 106% पेक्षा जास्त शक्यता आहे. माणिकराव खुळे यांनी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत 94 ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची 106% शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते जुलै महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. अधिक जाणून घेण्यासाठी खालील YouTube व्हिडिओ पहा…