Kharip msp 2024 ; खरीप पिकांचे 2024-25 साठी हमीभाव जाहीर…
Kharip msp 2024 ; केंद्र सरकारने दि. 19/जुन रोजी कॅबिनेट मंत्र्यासह मंत्रीमंडळाची बैठक घेतली या बैठकीत खरीप हंगामातील 14 पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आले. या 14 पिकांच्या हमीभावात काही प्रमाणात वाढ झाली आहे. पाहुया कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळाला.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या हमीभावाची अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात मात्र हमीभावात मोठी वाढ झाली नाही. पाहुया किती रुपये हमीभावात वाढ करण्यात आली आणि यंदा किती हमीभाव जाहीर झाला.
1) लांब धाग्याचा कापूस ; कापसाला 501 रूपये वाढ करून 7521 रुपये एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी 7020 रूपये एवढा हमीभाव होता
2) कापूस मध्यम धागा ; मध्यम धागा कापसाला 501 रूपये वाढ करून 7121 रुपये एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी 6620 रूपये एवढा हमीभाव होता
3) सोयाबीन ; सोयाबीनला 292 रूपये वाढ करून 4892 रुपये एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी 4600 रूपये एवढा हमीभाव होता.
4) तुर ; तुरीला 550 रूपये वाढ करून 7550 रुपये एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी 7000 रूपये एवढा हमीभाव होता.
5) मुग ; मुगाला 114 रूपये वाढ करून 8682 रुपये एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी 8558 रूपये एवढा हमीभाव होता.
6) उडीद ; उडीदाला 450 रूपये वाढ करून 7400 रुपये एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी 6950 रूपये एवढा हमीभाव होता.
7) मका ; मकाला 135 रूपये वाढ करून 2225 रुपये एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी 2090 रूपये एवढा हमीभाव होता.
8) बाजरी ; बाजरीला 125 रूपये वाढ करून 2625 रुपये एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी 2500 रूपये एवढा हमीभाव होता.
9) भुईमूग ; भुईमुगाला 406 रूपये वाढ करून 6783 रुपये एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी 6377 रूपये एवढा हमीभाव होता.
10) सूर्यफूल ; सुर्यफुलला 520 रूपये वाढ करून 7280 रुपये एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. मागील वर्षी 6760 रूपये एवढा हमीभाव होता.