Ladki bahin yojna ; अर्जाची लिंक आली का? अर्ज कधी सुरू होणार…
Ladki bahin yojna ; मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची अजितदादा पवार यांनी घोषणा केली आणि या योजनेचा शासन निर्णय तातडीने घेण्यात आला. लाडकी बहिण योजनेच्या शासन निर्णयानुसार दि. 01/जुलै पासून ऑनलाईन अर्ज सुरु होतील आणि 15/जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत असेल. परंतु तांत्रिक अडचणी येत असल्याने लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे पोर्टल सुरू झालेले नाही. (Ladki bahin yojna online)
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन किंवा संकेतस्थळ प्रकाशित झाले नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिला उत्सुक आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची वेळ कमी असुन त्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने पहिल्या दिवशी पोर्टल प्रकाशित झाले नाही त्यामुळे राज्यातील महिलांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा आहे. (Ladki bahin yojna online application)
या योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करून ठेऊन ऑनलाईन अर्ज सुरू होताच अर्ज भरून घ्यावे. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यावर आणि अर्ज कसा भरावा त्याबद्दल आपण नक्की माहिती घेऊ. तोपर्यंत आपण अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करून ठेवावी. (Mukhymantri ladki bahin yojna)
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पोर्टल, ॲप्लिकेशन प्रकाशित झाल्यावर त्याबद्दल आपण नक्की माहीती घेऊ. अजून या अर्जाची लिंक आलेली नाही लवकर हे अर्ज भरण्यासाठी पोर्टल प्रकाशित होईल.