Maharashtra rain news ; जुन च्या शेवटी आणि जुलै मध्ये पाऊस कसा राहिल..
Monsoon rain news ; हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ कृष्णानंद होसाळीकर यांनी पुढील चार आठवड्यांचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून २१/जूनपासून सक्रिय झाला असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल तसेच जुलै महिन्यातील पहिले दोन आठवड्यात पावसाचा जोर राहिल अशी माहिती ट्विट करत दिली आहे.
या वर्षी मान्सूनचे आगमन लवकर झाले असले, तरी तो सतत अडखळत राहिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात त्याची प्रगती लांबली आणि महाराष्ट्र ओलांडून पुढे जाण्यासाठी उशीर लागला. 20/जून रोजी मान्सूनने पुन्हा एकदा वेग पकडला आहे आणि मध्य प्रदेश बिहारला कव्हर केले आहे. होसाळीकर म्हणाले की, ईशान्य मान्सून म्हणजेच बंगालची शाखा बराच काळ सक्रिय नव्हती आणि आता दोन्ही शाखा एकत्र उत्तर भारतात प्रवेश करतील.
हवेचा दाब आणि वाऱ्याची दिशा अनुकूल असुन जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा वेग वाढणार असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले आहे. 21 जून ते 18 जुलै या चार आठवड्यांच्या कालावधीत मान्सून जोरदार बरसेल – (k.s.hosalikar IMD)
होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पुढच्या चार आठवड्यांचा अंदाज जाहीर केला आहे. 20/जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे आणि जूनच्या अखेरीस पावसाचा जोर वाढेल आणि जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (डॉ. कृष्णानंद होसाळीकर अतिरिक्त महासंचालक आयएमडी पुणे)