Maharashtra weather news ; पावसाचा जोर कधीपासून वाढणार माणिकराव खुळे..
Maharashtra weather news ; माणिकराव खुळे यांनी सध्याची मान्सुनची परिस्थिती पावसाचा अंदाज आणि आठवडाभरात हवामान कसे राहिल याबाबत माहिती दिली आहे. मान्सुनची वाटचाल रखडली असुन अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. खान्देश विदर्भात अजून मान्सून पोहोचला नसुन शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचा जोर कधीपासून वाढणार याबाबत निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेली माहिती पाहुया.
राज्यात जोरदार पाऊस कधीपासून – माणिकराव खुळे
अरबी समुद्रीय पश्चिमी वारे किनाऱ्यावरील 3100 मिटर उंचीवरील कमी दाबाच्या अस्तित्वामुळे मुंबई , ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 18 जुनपासुन ते 23 जुन पर्यंत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे असे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
मान्सुनची परिस्थिती पाहता पुढील पाच दिवसानंतर महाराष्ट्रात पोषक प्रणाली तयार होणार आहे आणि त्या प्रभावाने बंगाल ची शाखा पुढे सरकेल. अरबी समुद्राची शाखा सह्याद्रीच्या पुर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रणालीमुळे 23/ जुनपासुन पावसाचा जोर वाढणार आहे. (माणिकराव खुळे)
23/ जुन नंतर मान्सून सक्रिय होणार असून मुंबईसह संपूर्ण कोकणात अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच खानदेश, मराठवाडामराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे असे खुळे यांनी सांगितले आहे.