Majhi Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका अदिती तटकरेंचे बँकांना महत्त्वाचे आदेश

Majhi Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका अदिती तटकरेंचे बँकांना महत्त्वाचे आदेश

Majhi Ladki Bahin Yojana राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. जुलै महिन्यापासून महिलांनी अर्ज भरले आहेत. यानंतर आता हळूहळू तीन हजार रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जात आहे. पण ही रक्कम बँकांकडून कपात केली जात असल्याचं समोर आलं आहे.

कमीत कमी रक्कम खात्यात शिल्लक असावी अशी अट बँकांची असते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून (Majhi Ladki Bahin Yojana) मिळालेल्या रकमेतून बँकांनी रक्कम कापण्यास सुरुवात केली. तसेच काहींनी दंडात्मक स्वरुपाची रक्कम तर काही बँकांनी थकीत कर्जाच्या हफ्त्याची रक्कम म्हणून महिलांचे पैसे कापल्याच्या तक्रारी समोर आल्या. या तक्रारींची दखल घेत सरकारने बँकांना सूचना दिल्या आहेत.

 

अदिती तटकरेंचे बँकांना आदेश लोकप्रतिनिधींनी हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्या प्रकाराची महिला आणि बाल विकास विभागाने दखल घेतली आहे. याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी बँकांना सूचना केल्या आहेत.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही, कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावं, असेही निर्देशही बँकांना दिले आहेत.

 

Majhi Ladki Bahin Yojana कोणत्याही कर्जाच्या थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देऊ नये. काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठवण्यात आले असल्यास बँक खाते तत्काळ सुरू करण्यात यावे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही बँकांना करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top