Monsoon and Cyclone मान्सून चे आगमन व चक्रीवादळाची अपडेट – रामचंद्र साबळे
मान्सूनचे आगमन अंदमान निकोबार बेटावर झाले असून वेळे आधीच केरळ व महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे . 23 व 24 मे दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचे अंदाज आहे याचा मार्ग विदर्भ, ओडीसा, छत्तीसगड असा झाल्यास 27 मे दरम्यान विदर्भ व लगतच्या भागात मोठ्या पावसाचा अंदाज आहे.
आतापर्यंत वादळी पाऊस व आभाळी हवामान असल्यामुळे एवढा उन्हाळा जाणवला नाही परंतु 25 मे पर्यंत तापमान अधिक राहणार असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश व मध्य महाराष्ट्रात चांगलीच गर्मी जाणवेल.जळगाव, चंद्रपूर, अकोला, वर्धा अशा जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस राहू शकते.
मान्सून यंदा 19 मे रोजी अंदमानात दाखल झाला आहे. 2 दिवस अधीच यंदा मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. श्रीलंकेत 26 मे रोजी आणि केरळमध्ये 1 जुनपुर्वी मान्सून दाखल होईल तर महाराष्ट्रातही 7 जुनआधी मान्सून दाखल होईल तर विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात 12 जुनपुर्वी मान्सून दाखल होईल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
ला निनाचा प्रभाव सुरू झालेला आसून,त्यामुळे वारे भारताकडे वेगाने वाहु लागले आहेत. आणि लवकरच मान्सून वेगानं प्रगती करत देशासह महाराष्ट्रात दाखल होनार आहे. तसेच वेळेपुर्वीच तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
सविस्तर माहिती साठी खालील youtube video पहा