Monsoon big news ; अखेर मान्सून पुढे सरकला या भागात मुसळधार पावसाची शक्यता…
Monsoon big news ; पोषक वातावरण नसल्याने मान्सून मागिल आठ दिवसापासून एकाच ठिकाणी खोळंबला होता. थेट आठ दिवसाच्या विश्रांती नंतर मान्सून आज दि. 20/जुन रोजी पुढे सरकला असुन विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार च्या काही भागात दाखल झाला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी परीस्थिती अनुकूल आहे तसेच पुढील चार दिवसांत राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मागील सात आठ दिवसापासून पोषक वातावरण नसल्याने मान्सून एकाच ठिकाणी अडकला होता परंतु आज 20 जुन रोजी मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापला आहे. येत्या चार पाच दिवसात मान्सून अरबी समुद्रात गुजरात, मध्य प्रदेश, बंगालच्या उपसागरात झारखंड, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या काही भागात दाखल होईल असे पूर्वानुमान हवामान विभागाने दिले आहे.
20 जुन रोजी हवामान खात्याने कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी तसेच विदर्भात भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यात तसेच सातारा पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट दिला असून मध्यम सरीचा अंदाज वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
राज्यात शनिवार पासून पावसाचा जोर वाढेल व कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. शेतीविषयक महत्वाच्या बातम्या, हवामान अंदाज, शासन निर्णय, बाजारभाव व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा.