Monsoon rain ; पावसाचा जोर कधीपर्यंत राहणार ; या भागात जोरदार पावसाचा अंदाज
पुढील काही तासात कोकण, मध्य महाराष्ट्रील जिल्ह्यात जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिलाय..तर विदर्भातील जिल्ह्यात विजांच्या कडकडासह मुसळधारेचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने जारी केला आसून नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे येथे जिल्ह्यात पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा,अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम या जिल्ह्यात विजांसह मुसळधारेचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पुढील 4-5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा आँरेंज अलर्ट तर विदर्भात विजांसह मुसळधार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय..मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज देन्यात आला आहे.