Monsoon rain news ; पुढचे पाच दिवस राज्यात पाऊस कसा राहणार ; माणिकराव खुळे
Monsoon rain news ; जूनमधील राज्यात पावसाचे असमान वितरण झाल्यानंतर जुलैचा पहिला आठवडा संपत आलाय. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक आणि मुसळधार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पुढील पाच दिवस राज्यात पाऊस कसा राहील, याची माहिती हवामान खात्याचे निवृत्त तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. (Havaman aandaj today)
हवामान तज्ञ माणिकराव खुळे सांगतात की, गेल्या १० दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडत आहे. पुणे, नगर, सातारा, सांगली, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात १० जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Manikrao khule meteorologist Retd IMD)
विदर्भ आणि कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे परंतु वातावरणीय प्रणालींच्या तुलनेत खूप जास्त पाऊस कमी पडत आहे. पुढचे पाच दिवस कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Weather forecast today)
मराठवाड्यात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. माणिकराव खुळे यांनी मराठवाड्यात 10 जुलैपर्यंत हलका मध्यम पाऊस अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.(July weather forecast today)
कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 4, 2024