Mukhymantri annpurna yojna ; राज्यातील या कुटुंबांना तिन गॅस सिलेंडर मोफत – अन्नपूर्णा योजना

Mukhymantri annpurna yojna

Mukhymantri annpurna yojna ; राज्यातील या कुटुंबांना तिन गॅस सिलेंडर मोफत – अन्नपूर्णा योजना

Mukhymantri annpurna yojna ; अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 28/जुन रोजी अंतरीम अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि विशेष महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांना कोणत्या योजनेची घोषणा केली आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत कोणत्या कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहुया.

अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. या योजनेचा शासन निर्णय आला असून कोणत्या महिलांना सदर योजनेचा लाभ मिळेल याबद्दल स्पष्ट झाले आहे.

1) सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.

2) सद्य:स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील.

3) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब सदर योजनेस पात्र असेल.

4) एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल.

5) सदर लाभ केवळ 14.2 कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना लागु असेल.

Mukhymantri annpurna yojna ; या योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्जला योजनेच्या लाभार्थींना तसेच लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. हे तीन गॅस सिलेंडर चे पैसे महिलांच्या बॅंक खात्यात जमा केले जातील आधी हे गॅस सिलेंडर विकत घ्यावे लागतील. तुमच्याकडे दोन पेक्षा जास्त गॅस कनेक्शन असले तरीही तुम्हाला एक रेशनकार्ड म्हणजे एक कुटुंब याप्रमाणे तीन गॅस सिलेंडर मोफत चा लाभ मिळेल.

सदर योजनेचा शासन निर्णय अद्याप प्रकाशित झालेला नाही योजनेचा शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा. नवनवीन योजना, हवामान अंदाज, शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुप मध्ये सामील व्हा…

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top