Mukhymantri annpurna yojna ; राज्यातील या कुटुंबांना तिन गॅस सिलेंडर मोफत – अन्नपूर्णा योजना
Mukhymantri annpurna yojna ; अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 28/जुन रोजी अंतरीम अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि विशेष महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांना कोणत्या योजनेची घोषणा केली आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत कोणत्या कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहुया.
अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. या योजनेचा शासन निर्णय आल्यावर याबाबत अटी शर्ती समोर येतील.
Mukhymantri annpurna yojna ; या योजनेअंतर्गत केशरी आणि पिवळे शिधापत्रिका धारक कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. हे तीन गॅस सिलेंडर चे पैसे महिलांच्या बॅंक खात्यात जमा केले जातील आधी हे गॅस सिलेंडर विकत घ्यावे लागतील. तुमच्याकडे दोन पेक्षा जास्त गॅस कनेक्शन असले तरीही तुम्हाला एक रेशनकार्ड म्हणजे एक कुटुंब याप्रमाणे तीन गॅस सिलेंडर मोफत चा लाभ मिळेल.
सदर योजनेचा शासन निर्णय अद्याप प्रकाशित झालेला नाही योजनेचा शासन निर्णय (GR) आल्यावर याबाबत अधिक माहिती स्पष्ट होईल. नवनवीन योजना, हवामान अंदाज, शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुप मध्ये सामील व्हा…