News rain ; येत्या ४८ तासांत या भागात मुसळधार होसाळीकर यांचा अंदाज

\"News

News rain ; येत्या ४८ तासांत या भागात मुसळधार होसाळीकर यांचा अंदाज

News rain ; राज्यात गेल्या दोन दिवसांत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन अनेक पर्यटक अडकून पडले होते. येत्या ४८ तासांत राज्यात हवामान कसे असेल आणि जिल्हानिहाय पावसाचा अंदाज याबाबत माहिती हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. (Weather forecast today)

08/जुलै रोजी हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि ठाणे, पालघर, कोल्हापूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता आणि या जिल्ह्यात अतिवृष्टी सुद्धा झाली होती. (K.s.hosalikar)

हवामान खात्याने आज (09/जुलै/2024) पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Weather forecast today)

 

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/7Q9rBVvzpb

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 8, 2024

उत्तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे आणि मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील वर्धा,अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेले जिल्हानिहाय इशारे तसेच होसाळीकर यांनी दिलेली माहिती YouTube video मध्ये पहा. (today weather forecast)

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top