Nuksaan bharpaai नुकसान भरपाई चे अनुदान मिळाले नाही लवकर करा हि प्रोसेस ..
Nuksaan bharpaai ; यंदा राज्यात पावसात खंड पडला तसेच काही जिल्ह्यात अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तसेच जनावरांना चारा पाण्याचा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने परिस्थिती लक्षात घेऊन 40 तालुक्यात गंभीर ते मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. आणि 1200 पेक्षा अधिक महसूल मंडळामध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाचे वाटप सुरू आहे. तुम्हाला अद्याप नुकसान भरपाई मदत जर मिळाली नसेल तर तात्काळ आपल्या तलाठ्याकडे संपर्क करून आपले आधार कार्ड बॅक पासबुक घेऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करा. ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तीन चार दिवसांत तुम्हाला दुष्काळ अनुदान खात्यात जमा केले जाईल.
राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण सुरू आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे नुकसान भरपाई च्या अनुदानापासून वंचित आहेत. ई-केवायसी पुर्ण केल्यानंतर 6/7 दिवसात नुकसान भरपाईची मदत वितरित केली जाते.
तुम्हाला अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसेल तर तर तातडीने आपल्या तलाठ्याकडे संपर्क करून ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला दुष्काळी मदत खात्यात जमा केली जाईल. ई-केवायसी पुर्ण केल्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाई अनुदानाचे वितरण केले जाईल.