Pm kisan e-kyc news ; पीएम किसान योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना 4000 मिळणार
Pm kisan e-kyc news ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 17 वा हप्ता जारी केला आहे. वाराणसी येथील कार्यक्रम दरम्यान 18/जून रोजी दुपारी 02:00 नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 व्या हप्त्याचे वितरण केले जाईल. (Pm kisan e-kyc news 2024)
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे बॅक खाते आधारशी लिंक करणे आणि केवायसी करणे अनिवार्य आहे. ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी आणि बॅक अकाउंटमध्ये आधार लिंक नाही त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तुमच्या ई-केवायसी आणि बॅक खात्याशी आधार लिंक नसल्यास, ते लवकर करा जेणेकरून तुम्हाला पिएम किसान योजनेचे पुढील हप्ते मिळू शकतील. (Pm kisan 17\’th instalment date)
पीएम किसान योजनेंत ई-केवायसी किंवा खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे, पूर्वीचे काही हप्ते मिळाले नसतील आणि आता ई-केवायसी आणि बॅक खाते आधारशी जोडल्यास, या 17 व्या हप्त्यासोबत सर्व थकबाकीचे हप्ते जमा होतील. म्हणजे 17 व्या हप्त्यासोबत काही लाभार्थ्यांना 4000 तर काही लाभार्थ्यांना 6000 रुपये मिळतील.
तुमचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे का ते चेक करा जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर शक्य तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करा.
पिएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या नवीन अपडेट केलेल्या याद्या तुम्ही तुमच्या मोबाईल वर पाहु शकता. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा 17 वा हप्ता वितरित होणार आहे. यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुर्ण करा…
पिएम किसान योजनेची नवीन अपडेट झालेली यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम पिएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा.
(Pmkisan.gov.in)
त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका व त्यानंतर गावाचे नाव निवडून get report वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील ईकेवायसी पुर्ण असलेल्या 17 व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहता येईल…