Pmfby नोंदणी ; पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढली या तारखेपर्यंत विमा भरता येईल…
Pmfby नोंदणी ; प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४ करीता पीकविमा भरण्याची शेवटची तारीख १५/जुलै होती. परंतु पीक विम्याची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पीक विमा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने विमा नोंदणीसाठी दिलेल्या मान्यतेनुसार, प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२४ साठी पीक विमा नोंदणी ३१/जुलै पर्यंत करता येईल. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
हे वाचा – खरीप हंगाम 2023 साठी 7150 कोटी रुपये पीकविमा मंजूर , तुम्हाला मिळणार का
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप काही कारणास्तव पीक विम्यासाठी नोंदणी केलेली नाही त्यांनी तात्काळ पीक विमा नोंदणी पूर्ण करावी. ३१/जुलै पर्यंत, पीक विमा नोंदणीसाठी अजून १५ दिवसांचा अवधी आहे. ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि शेतीविषयक ताज्या माहितीसाठी आमचा whatsaap ग्रुप जॉईन करा.