Rain news maharashtra ; विदर्भाला जोरदार पावसासाठी जुलैची वाट पहावी लागणार…
Rain news maharashtra ; सध्या अरबी समुद्रात उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे हवामान विभागाने आज रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असुन जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबत ठाणे, पालघर, पुणे, मुंबई, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात यलो अलर्ट असून मध्यम पावसाचा अंदाज आहे.
अरबी समुद्राला लागून उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने राज्याच्या अंतर्गत भागात पावसाला अनुकूल परिस्थिती नाही असे हवामान तज्ञांकडून सांगितले जात आहे.
मान्सून वारे कमकुवत झाल्याने राज्याच्या अंतर्गत भागात त्याचा परिणाम दिसून येतोय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर कमी राहिल.
दक्षिण कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हल्का पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात 20/जुन पासुन मान्सून सक्रिय झाला होता मात्र थोड्या कालावधीनंतर विदर्भात पावसात खंड पडला आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भाला जोरदार पावसासाठी जुलै पर्यंत वाट पहावी लागणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे. येत्या 48 तासात राज्याच्या अंतर्गत भागात जोरदार पावसासाठी अनुकूल परिस्थिती नाही.