Rain news today ; मराठवाडा विदर्भात पाऊस कधीपासून सक्रिय होणार…
Rain news today ; राज्यात सध्या मान्सूनचा वेग मंदावल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे सांगितले जातय. शेतकरी मोठ्या व सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षेत आहेत परंतु जोरदार व मोठ्या पावसासाठी आणखी आठवडाभर वाट पहावी लागणार असल्याचे हवामान विभाग तज्ञ मेधा खोले यांनी सांगितले आहे.
डॉ मेधा खोले यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 30/ जुन रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आणि 06 जुन रोजी महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोहोचला व 09 जुन ला मान्सून मुंबई पुणे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यापर्यत विस्तारला. परंतु 01/जुन ते आतापर्यंत अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात एकही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नाही त्यामुळे मान्सूनचा जोर ओसरला दिसतो.
कोकणात पाऊस कधीपासून सक्रिय होणार – मेधा खोले
अरबी समुद्रातून येणारे वारे सक्रिय होत असून संपूर्ण किनारपट्टी भागात मान्सून 21/ जुन ते 22/ जुन दरम्यान सक्रिय होणार असल्याचे हवामानतज्ञ मेधा खोले यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट होत आहे.
विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र भागात पाऊस कधीपासून सक्रिय होणार – मेधा खोले…
कोकणात 22/ जुन पासुन पाऊस सक्रिय होत असल्याचा अंदाज आहे परंतु मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सक्रिय होण्यासाठी 24 ते 25 जुन पर्यंत वाट पहावी लागणार आहे. तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे हवामान विभाग संचालिका डॉ मेधा खोले यांनी सांगितले आहे.